"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

ग्रामपंचायत महालखेडा, येवला – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र

नाशिक-येवला  राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं , महालखेडा पाटोदा  गाव. सुमारे ४०९ लोकवस्तीचं हे गाव काळ धोंडी  नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.

धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
बुवाजी बाबा" हे महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि डिग्रस यांसारख्या भागांमध्ये प्रसिद्ध असलेले एक श्रद्धास्थान आहे. त्यातलेच एक मंदिर महालखेडा पाटोदा येथे आहे  हे देवस्थान नवसाला पावणारे असून यात्रोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होते

उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव

गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न, नांदूर मधमेश्वर डावा कालव्यामुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. प्रामुख्याने कांदा,मक्का ,सोयाबीन, टोमॅटो इत्यादी  यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते. तर गावच्या काही भागाची शेती अजूनही पावसाच्या पाण्यावर निर्धारित आहे. रोजंदारी, लघुउद्योग, अशी काही स्वप्नं तिथं मूळ धरू लागली आहेत
.

प्रगतीच्या वाटेवर- ग्रामपंचायत महालखेडा, येवला

हळूहळू काळाच्या ओघात गाव नवीन टेक्नॉलॉजीच्या सानिध्यात येत आहे , पण परंपरा जपली जातेय.इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय.येथे प्रामुख्याने २ ते ३ जाती वास्तव्यास आहे , पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे.महालखेडा पाटोदा नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे .काळ धोंडी नदी गावाच्या पायथ्याशी वाहते,तर अनेक नदी नाले गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते, इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,,

लोकसंख्या आकडेवारी


406
3351
1714
1637

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo